निवडणूक आयोगाने महिन्याभरात महाराष्ट्रातून जप्त केले मोठे घबाड

crore
मुंबई : गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रातून निवडणूक आयोगाने मोठे घबाड जप्त केले आहे. 112 कोटी रुपयांचा काळा पैसा आचारसंहिता लागू झाल्यानंतर ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यानंतर काळ्या पैशाच्या ‘हेराफेरी’ला लगाम लागवण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकाने दहा मार्च 2019 पासून महिन्याभराच्या कालावधीत राज्यातून 112 कोटी रुपये किमतीचा काळा पैसा जप्त केला आहे. निवडणूक आयोगाच्या पथकाने कारवाईत 40.81 रुपयांची रोकड, 44.76 कोटी रुपयांची सोनं-चांदी जप्त करण्यात आली आहे. तर 21.24 कोटी रुपयांचे मद्य, 6.12 कोटी रुपयांच्या ड्रग्जचाही यामध्ये समावेश आहे.

मतदारांना पैसे आणि मद्याच्या आमिषाने आकर्षित करण्यासाठी ही ‘हेराफेरी’ होत असल्याचे निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पण हा पैसे कुठून कुठे जात होता, याची नेमकी माहिती उपलब्ध झालेली नाही. निवडणूक आयोगासह कस्टम, आयकर विभागाची उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा असल्यामुळे यावर नजर आहे. मुंबईमध्ये चौथ्या टप्प्यात म्हणजेच 29 एप्रिलला मतदान होणार आहे. तोपर्यंत काळा पैसा आणि मद्याची ने-आण वाढण्याची शक्यताही आयोगाने वर्तवली आहे.

Leave a Comment