तारक मेहता…मधील जेठालाल सर्वात महागडा कलाकार!

jethalal
सध्या अनेक चर्चा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या कार्यक्रमाबद्दल सुरु आहेत. या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी म्हणजेच दया बेन हिने यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला आहे, त्यानंतर सोनू म्हणजेच निधी भानुशालीनेही अभ्यास करण्यासाठी कार्यक्रम सोडल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. मालिकेत पुन्हा काम करण्यासाठी अभिनेत्री दिशा वकानी हिने शूटींगच्या वेळेसह पैशासंदर्भात काही अटी ठेवल्या होत्या. पण या अटी मान्य न झाल्याने दिशाने कार्यक्रम सोडला. नुकतेच कार्यक्रमातील कलाकारांचे मानधन वाढवण्यात आले आहे. या मानधनात सर्वात महागडा कलाकार म्हणून जेठलाल म्हणजेच दिलीप जोशी ठरले आहेत.
jethalal1
दया बेनचे पती आणि टपू के पापा जेठलाल तारक मेहता का उल्टा चश्मामधील सर्वात महागडा कलाकार म्हणून ठरले आहेत. दिलीप जोशी यांना या नवीन पॅकेजनुसार एका एपिसोडचे एक लाख 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. या मालिकेतील दोन प्रमुख भूमिका साकारणाऱ्या दया बेन, जेठा लाल या दोघांनी प्रेक्षकांना प्रचंड हसवले आहे. तसेच हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून आतापर्यंत दया बेन आणि जेठालाल यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.
jethalal2
जेव्हा मालिकेत दिशा वकानी काम करत होती तिला तेव्हा एका भागासाठी एक लाख 20 हजार रुपये मानधन दिले जात होते. त्यानंतर निर्मात्यांनी दिशाला 50 हजार रुपये वाढवण्याचे आश्वासन दिले होते. पण ते पूर्ण न झाल्याने मालिकेतून दिशाने काढता पाय घेतला. सध्या तारक मेहता का उल्टा चश्मा या कार्यक्रमातील प्रत्येक महिला कलाकारांना 30 ते 35 हजार रुपये प्रती भाग मिळतात.
jethalal3
कार्यक्रमात तारक मेहताची भूमिका साकारणारे कवी शैलेश लोढा यांना प्रत्येक भागासाठी एक लाख रुपये ठरवून दिले आहेत. तसेच अय्यर भाईची भूमिका साकारणारे तनुज महाशब्दे आणि गुरुचरण सिंह सोढी यांना 65 ते 80 हजार रुपयांपर्यंत दिले जातात. बाबूजी, चंपकलाल म्हणजेच अमित भट्ट याला प्रत्येक भागासाठी 70 ते 80 हजार, आत्माराम भिडे म्हणजे मंदार चंदावरकरला 80 हजार, अब्दुल म्हणजे शरद संकला 35 ते 40 हजार, डॉक्टर हाथी म्हणजे निर्मल सैनीला 20 ते 25 हजार आणि टप्पू सेनाच्या प्रत्येक सदस्याला 20 हजार रुपये प्रति एपिसोड दिले जातात.

Leave a Comment