१८ एप्रिल रोजी राज ठाकरेंची पुण्यात प्रचारसभा

raj-thakre
पुणे – आपल्या सभांच्या माध्यमातून सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे मोदी आणि शहा या जोडीवर जोरदार टीका करत आहेत. त्याचबरोबर भाजपला मतदान करू नका, असे आवाहनही ते जनतेला करत आहेत. पुणे जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघांसाठीसुद्धा राज हे प्रचारसभा घेणार असल्याची माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली. १८ एप्रिल रोजी पुण्यात होणाऱ्या राज यांच्या सभेची मोठी उत्सुकता असल्याचे त्यांनी सांगितले.

वागस्कर म्हणाले, राज यांना मानणारा मोठा वर्ग पुणे जिल्ह्यात असल्यामुळे पुणे महापालिकेत २००९ च्या महापालिका निवडणुकीत २९ नगरसेवक निवडून आले होते. तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून मनसेच्या उमेदवाराने ९४ हजार मते घेतली होती. ती मते आता आमच्या पारड्यात पडतील, असा विश्वास काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वाटतो. पण आज परिस्थिती फार वेगळी आहे. कार्यकर्ते राज यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करत असले, तरी त्याला समर्थन किती मिळणार तसेच पुणेकर राज ठाकरेंना किती समर्थन देणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. मनसेचे कार्यकर्ते पुण्यातील सभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Leave a Comment