आता ‘अश्वत्थामा’च्या भूमिकेत विकी कौशल

vicky-kaushal
अभिनेता विकी कौशल ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला असून त्याला या चित्रपटानंतर बऱ्याच ऑफर्स येऊ लागल्या आहेत. पुन्हा एकदा ‘उरी’चे दिग्दर्शक आदित्य धर आणि निर्माते रॉनी स्क्रूवाला एकत्र काम करणार आहेत. त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी विकीचीच निवड केली आहे.

एक बिग बजेट चित्रपट ‘उरी’नंतर चित्रपटाच्या निर्मात्यांना प्रेक्षकांच्या भेटीला आणायचा होता. आदित्य धरने उरीच्या रिलीजनंतर आपल्या आगामी चित्रपटाच्या पटकथेवर काम करण्यास सुरुवात केली. अश्वत्थामा यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट असून त्यात विकी अश्वत्थामाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला पुढच्या वर्षीपासून सुरुवात होणार आहे. अश्वत्थामा यांच्या भूमिकेत विकीला पाहण्यासाठी त्याचे चाहतेसुद्धा उत्सुक आहेत.

करण जोहरच्या ‘तख्त’मध्येही विकी महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. आलिया भट्ट यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. ‘तख्त’मध्ये मुघल काळातील कथा दाखवली जाणार आहे. करण जोहर निर्मित या चित्रपटात विकी-आलियासह रणवीर सिंग, करिना कपूर, जान्हवी कपूर, अनिल कपूर, आणि भूमी पेडणेकर असे तगडे कलाकार आपले अभिनय कौशल्य पणाला लावताना दिसतील. २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल.