लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात ‘स्विगी’चा फूड डिलीव्हरी एक्झिक्युटिव्ह

swiggy
बंगळुरु : लोकसभा निवडणूक ‘स्विगी’ या फूड डिलीव्हरी करणाऱ्या ऑनलाईन अॅपचा अधिकारी लढवणार आहे. बंगळुरु मध्य मतदारसंघातून जेनिफर रसेल अपक्ष म्हणून रिंगणात उतरत आहे. केरळमधील तिरुअनंतपुरमचा जेनिफर रसेल हा रहिवासी आहे. रसेलसह 22 उमेदवार बंगळुरु मध्य मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. डिश अँटेना हे निवडणूक चिन्ह 38 वर्षीय जेनिफर रसेलने निवडले आहे.

रसेलने निवडणुकीच्या मैदानात काहीतरी आव्हानात्मक करण्याच्या इराद्याने उडी घेतली आहे. रसेलने मतदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी टेलिकॉम इंडस्ट्रीतील आपल्या भरपगारी नोकरीला रामराम ठोकला होता. त्याने आधी उबर जॉईन केल्यानंतर तो ‘स्विगी’मध्ये फूड डिलीव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणून रुजू झाला. सुरुवातीला आपण एसीमध्ये कारने प्रवास करायचो, पण आता बाईकवरुन जाताना प्रदूषण, रस्त्यावरील खड्डे, अस्वच्छता, कचऱ्याची दुर्गंधी, वाहतुकीच्या समस्या, पार्किंगचे प्रश्न आपल्याला समजले, असे त्याने सांगितले. भाजपने संघ परिवारात कार्यरत 28 वर्षीय तेजस्वी सुर्या यांना बंगळुरु मध्य मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसतर्फे 64 वर्षीय बीके हरिप्रसाद निवडणूक लढवणार आहेत.

Leave a Comment