मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर आपली हत्या निश्चित – शरद यादव

sharad-yadav
पाटणा – नरेंद्र मोदी जर दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर आपली हत्या होईल एवढे निश्चित असल्याचे धक्कादायक वक्तव्य लोकतांत्रिक जनता दलाचे (लोजद) नेते शरद यादव यांनी केले आहे. त्यांनी हे वक्तव्य लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर आयोजित एका सभेत बोलताना केले आहे. राजकीय वातावरण त्यांच्या या वक्तव्यानंतर तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विविध पक्षांच्या प्रचार सभांना लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उधाण आले आहे. दरम्यान वाटेल ते वक्तव्य राजकीय पक्षाचे नेते करत आहेत. आता शरद यादवांचे त्यामध्ये वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी बिहारच्या सहरसा येथे एका सभेला संबोधित करताना चक्क मोदी आपल्याला मारून टाकतील, असा आरोप केला. मोदी जर पुन्हा जिंकले आणि त्यांनी सरकार स्थापन केली तर ते आपल्याला गोळी मारून हत्या करतील किंवा आपल्याला तुरुंगात डांबतील, असे त्यांनी म्हटले.

बिहारमध्ये काँग्रेस, आणि लालू यादवांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलाशी शरद यादव यांच्या पक्षाने आघाडी केली असल्यामुळे भाजप आणि एनडीए पक्षांविरोधात मोठे आव्हान उभे झाले आहे. अशातच हे वक्तव्य शरद यादव यांनी राजकारण चमकवण्यासाठीच उद्गारले, अशी चर्चा सुरू आहे.

Leave a Comment