क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवावाने महिनाभरापूर्वीच भाजपत प्रवेश केला होता. त्यानंतर त्याचे वडील आणि बहिणीने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर तो कोणत्या पक्षाला पाठिंबा जाहीर देणार याचे उत्तर दिले आहे. रवींद्र जडेजानेही ट्विटरवरुन आता भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.
या पक्षाला जडेजाने दिला पाठिंबा
रविवारी जामनगरमधील कार्यक्रमात रवींद्र जडेजाची मोठी बहीण नयनाबा जडेजा आणि वडील अनिरुद्ध सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सरकारी रुग्णालयात नयनाबा या परिचारिका होत्या. त्यांना महिला सशक्तीकरणासाठी काम करायचे असल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे म्हटले होते.
रवींद्र जडेजाची पत्नी रिवावाने मार्च महिन्यात भाजपत प्रवेश केला होता. रवींद्र जडेजा या पार्श्वभूमीवर नेमका कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार, याची उत्सुकता निर्माण झाली होती. रवींद्र जडेजाने अखेर ट्विटरवरुन भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. भाजप, नरेंद्र मोदी आणि रिवावा जडेजा यांचे मी समर्थन करतो, असे ट्विटमध्ये रवींद्र जडेजाने म्हटले आहे.
I support BJP.@narendramodi #rivabajadeja jai hind 🇮🇳 pic.twitter.com/GXNz5o07yy
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) April 15, 2019
१५ वर्षांपूर्वी रवींद्र जडेजाच्या आईचे निधन झाले असून घराची जबाबदारी नयनाबा यांनीच सांभाळल्याचे सांगितले जाते. सध्या राजकोटमध्ये कुटुंबाने सुरु केलेले हॉटेल नयनाबा या चालवतात. करणी सेनेच्या महिला संघटनेच्या रिवावा जडेजा अध्यक्ष असून क्षत्रीय समाजाचा त्यांना पाठिंबा आहे. लोकसभा निवडणुकीत गुजरातमधून उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.