तब्बल ७० वर्षांनंतर फुटला अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात जर्मनीवर टाकलेला बॉम्ब

bomb
रविवारी जर्मनीच्या फ्रॅंकफर्ट शहरातील माइन नदीमध्ये दुसऱ्या महायुद्धातील एक बॉम्ब सापडला. रिपोर्टनुसार, दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकन विमानाने हा बॉम्ब पाडला होता. हा बॉम्ब ७० वर्षांनंतरही जिवंत असल्यामुळे नियंत्रित विस्फोटाच्या माध्यमातून बॉम्ब शोधक पथकाने हा बॉम्ब फोडून निष्क्रिय केला. हा धमाका एवढा जोरदार होता की, ३० मीटर उंच नदीतील पाणी उडाले होते.

आजूबाजूच्या ६०० लोकांना हा जोरदार धमाका करण्याआधी सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. असे सांगितले जात आहे की, फायर ब्रिगेड, पोलीस आणि रेड क्रॉसचे ३५० अधिकारी या संपूर्ण अभियानदरम्यान मदतीसाठी उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, नदीमध्ये ९ एप्रिलला फायर ब्रिगेडची टीम डायव्हिंगचा सराव करत होती.त्यांना हा बॉम्ब यादरम्यान आढळला. सुरुवातीला हा बॉम्ब डिफ्यूज करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण २५० किलो वजनाचा हा बॉम्ब डिफ्यूज करताना फुटू शकतो अशी भीती करण्यात आली होती.

हा बॉम्ब नदीत साधारण ५ ते ६ मीटर बॉम्ब शोधक पथक खोल घेऊन गेले. या बॉम्बचा त्यानंतर धमाका करण्यात आला. नदीतील जीवांना काही धोका होऊ नये म्हणूण नदीत आधी छोटे स्फोट करण्यात आले. जेणेकरुन नदीतील जीव दूर निघून जातील. ७० वर्षे दुसऱ्या महायुद्धाला लोटली असली तरी सुद्धा त्या काळातील जिवंत सक्रिय बॉम्ब अजूनही आढळतात. १९४५ मध्ये दुसरे महायुद्ध हे संपले होते. यात मोठ्या संख्येने सैनिक मारले गेले होते. जर्मनीवर त्यावेळी टाकण्यात आलेले काही बॉम्ब फुटलेच नाहीत. त्यामुळे हे बॉम्ब आताही फुटण्याचा धोका असतो.

Leave a Comment