‘भारत के वीर’च्या माध्यमातून लता मंगेशकर यांची शहीदांच्या कुटुंबियांना मदत

lata-mangeshkar
मुंबई – गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी १ कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून ही मदत ‘भारत के वीर’च्या माध्यमातून करणार असल्याची माहिती मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा नातू आदिनाथ मंगेशकर यांनी दिली.

तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे फेब्रुवारी महिन्यात जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलावर हल्ला केला होता. ४० पेक्षा अधिक जवान या हल्ल्यात शहीद झाले होते. कलाविश्वातील अनेकांनी या हल्ल्यानंतर शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. त्यानंतर आता १ कोटी रुपयांची मदत लता मंगेशकर यांनीदेखील जाहीर केली आहे. त्यांच्या व्यतिरिक्त मंगेशकर कुटुंबीय आणि त्यांचा मित्रपरिवारही ११ लाख रुपयांची मदत करणार आहेत. ही मदत नुकत्याच जाहीर झालेल्या मास्टर दीनानाथ पुरस्कारांच्या घोषणेवेळी जाहीर करण्यात आली. लता मंगेशकर, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment