डॅडींच्या संचित रजेवर २३ एप्रिलला होणार सुनावणी

arun-gawali
नागपूर – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कुख्यात डॉन अरुण गवळीने संचित रजेकरिता याचिका दाखल केली होती. सरकारी पक्षाने या प्रकरणी उत्तर दाखल करण्याकरता अतिरिक्त वेळेची मागणी न्यायालाय पुढे करत २३ एप्रिल पर्यंतची वेळ मागून घेतली आहे. संचित रजा कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी द्यावी, अशी मागणी अरुण गवळीने कारागृह प्रशासनाकडे केली होती. पण तो अर्ज कारागृह प्रशासनाने फेटाळल्याने न्यायालयात गवळीने धाव घेतली.

या प्रकरणी गेल्या माहिन्यात २१ मार्चला सुनावणी झाली असता न्यायालयापुढे सरकारी पक्षांनी वेळ मागितली होती. पण सरकारी पक्षांनी आताच्या सुनावणीमध्ये वेळ मागितली आहे. सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात अरुण गवळी कैदेत आहे. डॅडी उर्फ अरुण गवळी २०१८ पासून शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

Leave a Comment