तापसी, भूमीचा ‘सांड की आँख’ चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज

saand-ki-ankha
लवकरच अभिनेत्री तापसी पन्नु आणि भूमी पेडणेकर दोघीही पहिल्यांदा स्क्रिन शेअर करणार आहेत. या चित्रपटाचे नाव ‘सांड की आँख’ असे असून त्या दोघीही या चित्रपटात शार्पशूटर चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. या दोघींच्याही जीवनावर प्रकाश टाकणारा एक व्हिडिओ अलिकडेच शेअर करण्यात आला होता. आता तापसी पन्नु आणि भूमी पेडणेकर यांचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.

तापसी आणि भूमीचा फर्स्ट लूक असलेला फोटो ‘तन बुढा होता है, मन बुढा नही होता’, असे कॅप्शन देत शेअर करण्यात आला आहे. दोघीही या फोटोमध्ये वृद्ध अवतारात दिसत आहेत. दोघींच्याही हातात बंदुक घेतलेली आहे. तर, चंद्रो आणि प्रकाशी यांच्या ड्रेसींग स्टाईलमध्येच दोघींचाही लूक रिलीज करण्यात आला आहे. दोघीही या चित्रपटातून महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळतील.


दिग्दर्शक प्रकाश झा आणि मुक्काबाज फेम विनीत सिंग यांची देखील या चित्रपटात भूमिका आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला फेब्रुवारी महिन्यातच सुरुवात झाली आहे. या चित्रपटाचे नाव सुरुवातीला ‘वुमनीया’ असे ठेवण्यात आले होते. मात्र, पुढे ते बदलुन ‘सांड की आँख’, असे करण्यात आले.

या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि निधी परमार करत आहेत. तर, दिग्दर्शन तुषार हिरानंदानी हे करत आहेत. हा त्यांचा पहिलाच दिग्दर्शनीय चित्रपट आहे. यापूर्वी त्यांनी ‘दृश्यम’, ‘एक विलन’, ‘ए.बी.सी.डी.-२’ आणि ‘ग्रॅन्ड मस्ती’ यांसारख्या चित्रपटाचे कथानक लिहिले आहे.

Leave a Comment