निवडणूक आयोगाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडरलाच करता येणार नाही मतदान

rahul-dravid
बंगळुरू – बंगळुरूमध्ये १८ एप्रिलला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारताचा माजी दिग्गज फलंदाज आणि ‘द वॉल’ म्हणून प्रसिध्द असलेला राहुल द्रविड मतदान करु शकणार नाही. मतदार यादीत द्रविडचे नाव नसल्याने त्याला यावेळी मतदान करता येणार नाही. कर्नाटक निवडणूक आयोगाचा द्रविड हा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर असून मतदानापासून आता तोच वंचित राहणार असल्याने संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे.

२०१८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान राहुल द्रविडने आपले घर बदलले होते. राहुलने त्यावेळी जुन्या मतदारसंघातून आपले नाव वगळले होते. पण तो नव्या घरी जेव्हा राहायला गेला तेव्हा त्याने आपल्या नव्या पत्त्यावरुन मतदानाचा अर्ज न भरल्यामुळे राहुलचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आल्याने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तो मतदान करु शकणार नाही. मतदारसंघातून आपले नाव वगळ्यासाठी मतदाराला अर्ज क्रमांक ७ भरावा लागतो. तर पुन्हा मतदानासाठी अर्ज क्रमांक ६ भरणे गरजेचे असते. पण अर्ज क्रमांक ६ द्रविडने भरला नसल्याने त्याचे नाव मतदारयादीतून काढण्यात आले आहे.

Leave a Comment