आझम खान आणि मेनका गांधींच्या प्रचारावर निवडणूक आयोगाची बंदी

election
लखनौ – निवडणूक आयोगाने बसपच्या सर्वेसर्वा मायावती आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्यावर प्रचार करण्याची बंदी आणल्यानंतर, आता आयोगाने आणखी दोन नेत्यांना दणका दिला आहे. समाजवादी पक्षाचे नेते आझम खान आणि भाजप नेत्या मनेका गांधी यांचा यामध्ये समावेश आहे. या दोघांवर प्रचार सभांमध्ये आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

जमेल तशी वक्तव्य लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर नेते करत आहेत. निवडणूक आयोगाने सोमवारी मायावती आणि योगी आदित्यनाथ यांना प्रचार करण्यास बंदी घातल्यानंतर जयाप्रदा यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आझम खान यांना दणका दिला आहे. तर, भर सभेत मुस्लिमांना धमकी दिल्यावरुन आयोगाने भाजप नेत्या मनेका गांधी यांनी जोरदार धक्का दिला आहे.

आयोगाने आझम खान यांना ७२ तासापर्यंत कोणत्याही सभेत हजर न राहण्याचे निर्देश दिले आहे. तर, कोणत्याही स्थितीत प्रचार न करण्याची ताकीद दिली आहे. तसेच ४८ तास मेनका गांधी यांना प्रचार सभांमध्ये भाग घेणे आणि प्रचार करण्यावर बंदी आणली असल्यामुळे निवडणूक आयोग आता सक्रिय कारवाई करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना या आदेशाचे आज सकाळी १० वाजतापासून पालन करणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांच्यावर आयोग मोठी कारवाई करू शकते. त्यामध्ये त्यांना निवडणूकीच्या रिंगणातून बाहेर होण्याचेही आदेश मिळू शकतात.

Leave a Comment