लग्न आणि घटस्फोट ही गोष्ट बॉलिवूडमध्ये आता सामान्य बनली आहे. जेवढ्या धामधुमीत बॉलिवूड कलाकार लग्न करतात ते तेवढ्याच समजूतदारपणे नात्यात दुरावा आल्यावर वेगळेसुद्धा होतात. असेच काही टीव्ही आणि बॉलिवूड कलाकार ज्यांनी घटस्फोट झाल्यावर लगेच दुसऱ्यांदा संसार थाटला आहे. तर काहींनी घटस्फोट घेतल्यावर जास्त वेळ न घालवता काही महिन्यांतच लग्न केले. आज आम्ही तुम्हाला अशाच कलाकारांची माहिती सांगणार आहोत.
पहिली पत्नी सुगंधाशी घटस्फोट घेतल्यावर एमटीव्ही रोडि्ज फेम अभिनेता रघु रामने दुसरा जोडीदार शोधण्यास उशीर केला नाही. 2006मध्ये सुगंधाशी रघु रामने लग्न केले होते. पण हे दोघे 10 वर्षांनंतर वेगळे झाले आणि रघु रामने 2018मध्ये दुसरे लग्न केले. त्याने गर्लफ्रेंड नतालीशी 12 डिसेंबरला लग्नगाठ बांधली.
आपली पहिली पत्नी कोमलला घटस्फोट देत बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि अभिनेता हिमेश रेशमियाने मे 2018मध्ये गर्लफ्रेंड सोनिया कपूरशी लग्न केले. 1995मध्ये कोमल आणि हिमेशने लग्न केले होते पण ते 2017मध्ये दोघे एकमेकांपासून वेगळे झाले.
अभिनेत्री करिना कपूर सोबत ‘वीरे द वेडिंग’ मध्ये लीड रोडमध्ये दिसलेल्या सुमित व्यासने आपली पत्नी शिवानी टांकसाळेला 2018मध्ये घटस्फोट दिल्यानंतर 6 महिन्याच्या आतच अभिनेत्री एकता कौलशी लग्न केले.
एप्रिल 2016मध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू आणि टीव्ही अभिनेता करण सिंह ग्रोवर लग्नाच्या बेडीत अडकले. पण सर्वात आधी करणने श्रद्धा निगम आणि त्यानंतर जेनिफर विंगेट सोबत लग्न केले होते मात्र त्याची ही दोन्ही लग्न जास्त काळ टिकू शकली नाहीत. त्याने त्यानंतर बिपाशाशी लग्न केले. बिपाशा आणि करण यांनी लग्नाआधी ‘अलोन’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.