नमो भक्तांनी त्यांची आरती घरी करावी – उर्मिला मातोंडकर

urmila-matondkar
मुंबई – काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या काल सकाळी बोरिवली रेल्वे स्थानक परिसरात प्रचार सभेदरम्यान भाजप काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी या घटनेनंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे.

मोदी मोदींच्या घोषणा माझ्या प्रचारा दरम्यान करून भितीदायक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा नमो भक्तांनी घरी त्यांची आरती करावी असा घणघणात काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी केला आहे. माझा उमेदवारी अर्ज रद्द व्हावा यासाठी भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी माझ्या अर्जात कमी शोधण्यासाठी निवडणूक आयोग कार्यालयात बैठक केली होती, असा आरोप उर्मिला यांनी गोपाळ शेट्टी यांच्यावर केला.

नियोजित प्रचार सभेत येऊन भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत मारहाण केली, त्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. तसेच पोलिसांकडे तक्रार केली असून याबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी उर्मिला यांनी केली आहे. उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी या सर्व आरोपांचे खंडण केले आहे. मी निवडणूक आयोग कार्यालयात उमेदवारी छाननी अर्जावेळी गेलो होतो, उर्मिला यांचे वकील देखील त्यावेळी तेथे उपस्थित होते. तसेच ज्यांनी मोदींच्या घोषणा दिल्या ते सामान्य नागरिक होते. जर उर्मिला यांना तक्रार करायची असल्यास त्यांनी जरूर करावी असे शेट्टी यांनी म्हटले. मी उर्मिला मातोंडकर यांना फक्त उमेदवार म्हणून पाहतो, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर मी केव्हाही कोणतीही टीका केली नसल्याचे स्पष्टीकरण गोपाळ शेट्टी यांनी केले.

Leave a Comment