अभिनेता रितेश देशमुखची जाहीररित्या केंद्रातील भाजप सरकार टीका

Riteish-Deshmukh
मुंबई – काँग्रेसच्या एका व्यासपीठावर जाहीररित्या केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अभिनेते रितेश देशमुख याने सडकून टीका केली. रितेशने मोदींच्या ५६ इंच छाती या मुद्द्याची खिल्ली उडवताना ५६ इंचाचे तर गोदरेजचे कपाट येते, असे म्हटले आहे. सोशल मीडियावर रितेशच्या या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नुसत्याच बढाया मारतात, प्रत्यक्षात ते ज्या गोष्टींचा खुबीने वापर करीत आहेत त्या सर्व काँग्रेसची देण असल्याचे रितेश म्हणाला आहे. आपण आज जे फेसबूक, ट्विटर वापरतो त्यासाठी लागणारा कॉम्प्युटर आणि मोबाईल ही देखील काँग्रेसचीच देण असल्याचा उल्लेख रितेशने केला आहे. याआधी काँग्रेसने काहीही केलेले नाही पण आपणच सर्वकाही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर करतो असल्याचे मोदींना वाटते. पण काँग्रेसमुळेच भारताला स्वातंत्र मिळाले हे तुम्ही लक्षात ठेवावे, असे रितेशने म्हटले आहे.

(व्हिडीओ सौजन्य – एबीपी माझा)
रितेश मोदींच्या ५६ इंच छाती या मुद्द्यावरुनही टीका करताना म्हणाला, मला याबाबत प्रियंका गांधींचे एक वाक्य आठवते ते म्हणजे, ५६ इंच छाती नव्हे तर एक ह्रदय देश चालवायला लागते, चांगले मन लागते. पण मी विचार करीत होतो की ५६ इंच छाती म्हणजे केवढी मोठी छाती असते. ५६ इंचाच तर गोदरेजचे कपाट येते, अशा शब्दांत रितेशने मोदींवर टीका केली.

Leave a Comment