९२ वर्षीय आजोबांचे विक्रमी रक्तदान, १२०० जणांना दिले जीवनदान

reidy
रक्तदान हे महत्पुण्य आहे असे नुसते म्हणत न बसता अमेरिकेतील ९२ वर्षीय आजोबा रॉन रिडी यांनी त्याचे प्रत्यक्ष उदाहरण सादर केले आहे. रक्तदानात कुणी रेकॉर्ड नोंदवेल असा विचारही कधी कुणाच्या मनात आला नसेल पण रॉन आजोबांनी हे रेकॉर्ड नोंदविण्यासाठी केलेले नाही तर लोकांना जीवनदान देण्यात जो आनंद आहे तो पुरेपूर उपभोगता यावा यासाठी केले आहे.

विशेष म्हणजे रॉन आजोबांचे वय जसे वाढत चालले आहे तशी रक्तदान करून गरजूंना जीवनदान देण्याची त्यांची तहान वाढत चालली आहे. त्यांनी आत्तापर्यंत ४०० वेळा रक्तदान करताना १८९ लिटर रक्त दिले असून त्यामुळे किमान १२०० जणांचा जीव नक्कीच वाचला आहे. या निमित्त यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. रॉन सांगतात ६० च्या दशकात त्यांनी सर्वप्रथम सॅन डियागो येथे त्यांच्या मित्राला रक्त दिले आणि त्यानंतर दर दोन आठवड्यांनी ते ब्लड प्लेटलेट देत आहेत. रॉन लवलंड येथे राहतात. ते म्हणाले माझे वय वाढले आहे त्यामुळे मी आता ब्लड प्लेटलेट डोनेट करू शकत नाही पण रक्तदान करू शकतो. शक्य आहे तोवर दर दोन महिन्यांनी ते रक्तदान करणार आहेत.

लवलंड पोलीस आणि ब्लड डोनेशन सेंटर यांनी रॉन आजोबांचा सन्मान केला आहे. रॉन यांना अजून थांबायचे नाही तर रक्तदानाचे रेकॉर्ड बनवायचे आहे कारण त्यामुळे तरुण पिढीला रक्तदानासाठी प्रेरणा मिळेल असे त्यांना वाटते. ते म्हणतात लोकांना जीवनदान देण्यात जो आनंद आहे तो वर्णन करता येणार नाही. व्हायटालंड ब्लड सेंटरचा ज्या एनजीओ बरोबर संपर्क आहे त्या सर्व २७ ब्लड डोनरना रॉन आजोबांनी मागे टाकले आहे. या ब्लड सेंटरची मॅनेजर लीज लेम्बार्त म्हणते एक रक्तदान म्हणजे तीन जीवनदान असे समीकरण आहे. त्या हिशोबाने रॉन आजोबांनी १२०० जणांना जीवनदान दिले आहे.

Leave a Comment