सोने पॉलिशची पोर्शे जर्मनीत जप्त तर ब्रिटनमध्ये सोन्याच्या कार्सचा ताफा

gporche
जर्मनीमधील हँबुर्ग शहरात पोलिसांनी सोन्याचे पॉलिश केलेली पोर्शे कार जप्त केल्याची घटना घडली असून ती टो करून पोलीस गॅरेज मध्ये नेण्यात आली आणि नंतर चालकाने योग्य दंड भरल्यावर त्याला परत करण्यात आली. कार जप्त करण्यामागे कारण घडले ते असे कि ही कार इतकी चमकत होती कि त्याच्या प्रकाशाने अन्य वाहन चालकांचे डोळे दिपत होते व त्यामुळे वाहन अपघात होण्याची भीती निर्माण झाली होती.

golden
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी प्रथम ही कार थांबबून चालकांना हे पॉलिश काढून टाक आणि पुन्हा कारची नोंदणी कर असे सांगितले मात्र चालकाने यातील काहीच केले नाही. दुसऱ्यावेळी पोलिसांनी ही कार पहिली तेव्हा ती जप्त करून पोलीस गॅरेजमध्ये नेली. ३१ वर्षीय चालकाचा परवाना, लायसन्स प्लेट आणि कारच्या किल्ल्या पोलिसांनी काढून घेतल्या, नंतर चालकांना दंड आकारून ती सोडली गेली.

fleet
याचवेळी पोलिसांनी सोन्याचे असेच पॉलिश केलेली एक लोम्बार्गिनी कार पकडल्याची माहिती मिळाली आहे तर ब्रिटनमध्ये वेगळाच प्रकार घडला. हेरोड्स या प्रसिद्ध डिपार्टमेंटल स्टोरच्या समोर १६ एप्रिल रोजी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला कारण या स्टोरसमोर चक्क चार चार महागड्या सोन्याने चमकत असलेल्या कार्स खड्या होत्या. फेरारी ४५८ स्पायडर, बेन्टले, पोर्शे आणि मर्सिडीज या गाड्या रस्त्यावर उभ्या पाहून लोकांनी डोळे चोळून पुन्हा खात्री करून घेतली पण नंतर खुलासा झाला कि टॉप गिअरच्या नवीन सिरीज चित्रीकरणासाठी या कार्स येथे उभ्या केल्या होत्या. त्यातील फेरारी ४५८ स्पायडर कन्व्हर्टीबल विशेष आकर्षणाचे केंद्र ठरली होती.

Leave a Comment