‘मोगरा फुलला’ हा चित्रपट घेऊन लवकरच स्वप्निल जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वप्नीलची नवी भूमिका चाहत्यांना या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाद्वारे बऱ्याच वर्षांनी श्रावणी देवधर यांनी कमबॅक करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.
स्वप्निल जोशीच्या ‘मोगरा फुलला’चे नवे पोस्टर रिलीज
स्वप्निलसोबत दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे देखील ‘मोगरा फुलला’ या चित्रपटात भूमिका साकारणार आहेत. स्वप्निल जोशी ‘सुनील कुलकर्णी’ तर, चंद्रकांत कुलकर्णी हे ‘मध्या काका’च्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात साई शक्ती आनंद, नीना कुलकर्णी, संदीप पाठक, आनंद इंगळे, सुहिता थत्ते, समिधा गुरू, विघ्नेश जोशी, दीप्ती भागवत, प्राची जोशी, विक्रम गायकवाड यांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत.
Swwapnil Joshi [as Sunil Kulkarni] and well-known film director Chandrakant Kulkarni [as Madhya Kaka]… New poster of #Marathi film #MograPhulaalaa… Directed by Shrabani Deodhar… Produced by Arjun Singgh Baran and Kartik D Nishandar… 14 June 2019 release. pic.twitter.com/6Y4XJKKzVt
— taran adarsh (@taran_adarsh) April 15, 2019
कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडता पडता लग्नाचे वय सरून गेलेल्या एका तरुणाची गोष्ट श्रावणी देवधर यांच्या या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. या चित्रपटातून त्याच्या आयुष्यात एका वेगळ्या पार्श्वभूमीची मुलगी येते आणि त्याचे आयुष्य कसं बदलून जाते हे दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या कथेवर श्रावणी देवधर यांच्यासोबत लेखक सचिन मोटे यांनीही काम केले आहे. या चित्रपटाची निर्मिती अर्जुन सिंग बारन आणि कार्तिक निशानदार यांच्या ‘जिसीम्स’ या कंपनीने केली आहे. हा चित्रपट १४ जून रोजी रिलीज होईल.