तरुणांसोबत पोहण्याचा मोह खासदार संभाजीराजेंना अनावर

sambhaji-rae
कोल्हापूर : शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा आगामी लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी खासदार संभाजीराजे दोन दिवसाच्या चंदगड तालुक्यात दौऱ्यावर होते. धलगरवाडी येथे रस्त्याकडेला असलेल्या नदीत पोहणारी मुले प्रचारादरम्यान त्यांना दिसली आणि नदीत पोहण्याचा मोह संभाजी राजेंना अवरता आला नाही. खासदार संभाजीराजे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी चंदगड दौऱ्यावर होते.

खासदार संभाजी राजेंनी गाडी थांबवत कसलाही विचार न करता पाण्यात सूर मारला. सुरक्षा रक्षक मनाई करत असतानाही राजेंनी पाण्यात सूर मारला. आपल्यामध्ये खुद्द राजांना पाहून नदीत पोहत असलेल्या तरुणांनीसुद्धा भरपूर आनंद झाला. मुलांनी राजेंसोबत मौजमजा करीत पोहण्याचा आनंद लुटला. नदीच्या थंडगार वाहत्या पाण्यात पोहून त्यांना विरंगुळा मिळाला. खासदार संभाजी राजे आज आपले राजेपण विसरुन जनतेत एकरुप होऊन गेले. मुलांनी हीच संधी साधून संभाजीराजेंसोबत फोटो काढून घेतले.

Leave a Comment