मुंबई नव्हे तर ‘या’ शहरांमध्ये मध्यरात्रीच्या होतात सर्वाधिक फूड ऑर्डर

zomato
हॉटेल, स्ट्रीट फूड अगदी ब्रेकफास्टपासून ते डेझर्टपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही रात्री-अपरात्री वेगवेगळ्या ठिकाणहून झोमॅटोवरून मागवत असता. आपला वार्षिक अहवाल नुकताच झोमॅटोने सादर केला आहे. झोमॅटोची सेवा 200 शहरांमध्ये आहे. झोमॅटोवर एक लाखापेक्षा जास्त रेस्टॉरंट्स लिस्टेड आहेत. 33 दशलक्ष खाद्यपदार्थांच्या ऑर्डस झोमॅटोवरून घेऊन लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत.
zomato3
झोमॅटो बिहारमध्ये बगलपूर आणि गया दोन्ही शहरांमध्ये सायकलवरून फूडची डिलिव्हरी करते. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तिथे दुचाकीपेक्षा सायकल वापरण्यावर भर दिला जातो. आसाममधील गुवाहाटी येथे प्रत्येक ठिकाणी फूड डिलिव्हरी अगदी सहज होते असे नाही? बह्मपुत्रा नदी ओलांडण्यासाठी तिथे चक्क बोटीतून प्रवास करून डिलिव्हरी बॉय फूड डिलिव्हरी देतो.
zomato1
स्ट्रीट फूडसाठी मध्य प्रदेशमधील इंदौर हे प्रसिद्ध आहे. रात्रभर येथील खाऊ गल्ल्या नागरिकांच्या मनाला भुरळ घालत असतात. येथील स्थानिक लोकच नाही तर पर्यटकही घरबसल्या मध्यरात्री खाऊ गल्लीतील पदार्थांची ऑर्डर झोमॅटोवरून दिली जाते. याशिवाय मध्यरात्री झोमॅटोवरून मुंबईतही अनेक लोक निरनिराळ्या पदार्थांची ऑर्डर देत असतात.
zomato2
सर्वात उंचावर आणि पर्यटकांचे तमिळनाडूमधील उटी आवडते ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. हिलस्टेशनवर जवळपास झोमॅटोवर 200 हून अधिक वेगवेगळ्या फूडऑर्डर्स स्वीकारल्या जातात. झोमॅटोवरून राजस्थानमधील कोटामधून खाद्य मागवण्याची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे जयपूरमध्ये दिवसाला 415 फूड डिलिव्हरी केल्या जात असल्याची माहिती झोमॅटोने दिली आहे.
zomato4
झोमॅटोने राजस्थानमधील 48 हॉटेलशी टायअप केले आहे. राजस्थानमध्ये झोमॅटोवर एका दिवसात 292 फूड डिलिव्हरी ऑर्डर होत असल्याची नोंद करण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटकातील मणिपालमध्ये सर्वाधिक फूड डिलिव्हरी केली जाते. गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात सर्वाधिक फूड ऑर्डर मागवली जाते. पिझ्झाची सर्वाधिक ऑर्डर करणारे शहर म्हणून झोमॅटोच्या लिस्टवर अहमदाबाद हे दुसऱ्या स्थानावर आहे. आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथील ब्रेकफास्टचे प्रकार प्रसिद्ध आहेत. विजयवाडा येथूनच झोमॅटोवर सर्वात जास्त ब्रेकफास्टची ऑर्डर केली जाते. जम्मू-काश्मीरमध्ये झोमॅटोवरून फास्ट फूड सर्वात जास्त मागवले जाते. फास्ट फूड मागवणाऱ्या शहरांमध्ये काश्मीर तिसऱ्या स्थानावर आहे.

Leave a Comment