‘भारत’ चित्रपटात प्रेक्षकांना सलमान खान आणि कतरिना कैफ ही जोडी पाहायला मिळणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक अली अब्बास जफर हे करत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी एप्रिल महिन्यात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होईल, असे सोशल मीडियावर सांगितले होते. आता या चित्रपटातील कतरिनाचा एक फोटोदेखील व्हायरल होत आहे.
सोशल माडियात व्हायरल होत आहे कतरिना कैफचा ‘भारत’मधील ‘हा’ फोटो
हा फोटो कतरिनाने देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या चित्रपटात तिचे कुरुळे केस पाहायला मिळणार आहेत. तिच्या या फोटोवर अवघ्या काहीच तासामध्ये ५ लाखापेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.
चाहते ‘भारत’ चित्रपटाच्या ट्रेलर पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर १० दिवसानंतर प्रदर्शित होईल, असे कतरिनाच्या फोटोवरून चाहते अंदाज लावत आहेत. या चित्रपटाचा टीजर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. सलमान खानच्या वेगवेगळ्या व्यक्तीरेखा या टीजरमध्ये पाहायला मिळाल्या. हा चित्रपट ६ जून रोजी रिलीज होणार आहे.