शेखर कपूर बनवणार ‘ब्रुस ली’चा बायोपिक

bruce-lee
सध्या जगभरातील प्रेक्षकांच्या आवडीचा विषय अ‍ॅक्शनपट हा आहे. ‘ब्रुस ली’ या अभिनेत्याने या अ‍ॅक्शन चित्रपटांची खऱ्या अर्थाने सुरुवात केली. आपल्या अजब ‘कुंग फू फाइट’ शैलीतून अभिनेता म्हणून सुमार असणाऱ्या ब्रुस लीने अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांची मने जिंकली. जॅकी चॅन, जेट ली, डोनी येन, नीना ली यांसारखे अनेक अभिनेते पुढे याच ‘ब्रुस ली’च्या फाइट शैलीचे अनुकरण करत ‘अ‍ॅक्शन स्टार’ म्हणून नावारूपाला आले.

प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर या सुपरस्टारच्या आयुष्यावर आधारित ‘लिटिल ड्रॅगन’ नामक चित्रपटाची निर्मिती करत आहेत. आपल्या दिग्दर्शन शैलीसाठी हॉलीवूड आणि बॉलीवूड दोन्हीकडे प्रसिद्ध असणाऱ्या शेखर कपूर यांनी तत्पूर्वी ‘मासूम’, ‘भुला ना देना’, ‘मिस्टर इंडिया’, ‘बॅन्डिट क्वीन’, ‘पानी’ यांसारखे सुपरहिट हिंदी चित्रपट आणि ‘एलिझाबेथ’, ‘न्यूयॉर्क आय लव यू’, ‘एलिझाबेथ द गोल्डन एज’, ‘पॅसेज’ या हॉलीवूड चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे; पण ब्रुस लीच्या आयुष्यावर चित्रपट तयार करणे हे त्यांच्यासाठी खरे आव्हान आहे.

Leave a Comment