लक्षवेधी ठरत आहे सलमानचा ‘भारत’मधील वयोवृद्ध लूक

salman-khan
नुकताच सलमान खानच्या बहुचर्चित ‘भारत’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सलमानचा हा अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटातील लूक लक्षवेधी ठरत आहे. यामध्ये सलमानसोबतच अभिनेत्री कतरिना कैफसुद्धा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला यावर्षी ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच ५ जून रोजी येणार आहे.


या पोस्टरवर देश आणि एका व्यक्तीचा एकत्रित प्रवास, अशी टॅगलाइन लिहिली आहे. सलमानने वयोवृद्ध लूकमधील हा पोस्टर शेअर करत लिहिले, जितने सफेद बाल मेरे सिर और दाढी मै है, उससे कई ज्यादा रंगीन मेरी जिंदगी रहीं है. या पोस्टरमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि जॅकी श्रॉफसुद्धा पाहायला मिळत आहेत.

भारत हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” दक्षिण कोरियन चित्रपटावर आधारलेला आहे. रशियन सर्कस आणि अन्य काही साहसी दृश्य ‘भारत’ चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. दिशा पटानी, नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर असे अनेक कलाकार ‘भारत’मध्ये पाहायला मिळणार आहेत.

Leave a Comment