बहुजन समाज पक्ष सर्वात श्रीमंत पक्ष

mayawati
नवी दिल्ली – इतर सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना बँक बॅलेन्सच्या बाबतीत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने (बसप) मागे टाकले आहे. निवडणूक आयोगाकडे २५ फेब्रुवारी रोजी आपल्या एकूण खर्चाची माहिती बसपने दिली असून यानुसार एकूण ६६९ कोटी रुपये राजधानी दिल्लीतील सरकारी बँकांच्या शाखेमधील आठ वेगवेगळ्या खात्यांमध्ये डिपॉजिट आहेत.

२०१४ लोकसभा निवडणुकीत आपले खातेही न खोलू शकलेल्या आपल्या हातात सध्या ९५.९४ लाख इतकी रोख रक्कम असल्याची माहिती बसपने दिली आहे. दरम्यान या यादीत समाजवादी पक्ष दुसऱ्या स्थानावर असून पक्षाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण ४७१ कोटी रुपये आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणामधील विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाचा कॅश डिपॉझिट ११ कोटींनी कमी झाला.

या यादीत काँग्रेस तिसऱ्या स्थानावर आहे. १९६ कोटींचा बँक बॅलेन्स काँग्रेसकडे आहे. पण गतवर्षी २ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाला ही माहिती देण्यात आलेल्या माहितीच्या आधार देण्यात आली आहे, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयानंतर काँग्रेसने आपल्या बँक बॅलेन्सची माहिती अपडेट केलेली नाही.

मात्र या यादीत प्रादेशिक पक्षांच्याही मागे भाजप पडली आहे. टीडीपीनंतर भाजप पाचव्या स्थानावर आहे. ८२ कोटींचा बँक बॅलेन्स भाजपकडे आहे तर १०७ कोटींचा टीडीपीजवळ आहे. भाजपचा दावा आहे की, २०१७-१८ मध्ये मिळालेल्या १०२७ कोटींपैकी ७५८ कोटी खर्च करण्यात आले. कोणत्याही पक्षाकडून खर्च करण्यात आलेली ही सर्वात जास्त रक्कम आहे.

Leave a Comment