विशालकाय विमानाचे चाचणी उड्डाण यशस्वी

viman
जगातील सर्वात मोठे विमान अशी नोंद झालेले विशालकाय विमान पहिल्या चाचणी उड्डाणासाठी कॅलिफोर्नियाच्या मोझावे एअर अँड स्पेस पोर्टवरून शनिवारी सकाळी ६ वा.५८ मिनिटांनी आकाशात झेपावले आणि अडीच तासाचे उड्डाण करून परत सुखरूप उतरले. या विमानाला ६ बोईंग ७४७ इंजिन लावली गेली असून त्याच्या पंखांची लांबी ३८५ फुट तर विमानाची लांबी २३८ फुट इतकी आहे. या विमानांचे पंख एका फुटबॉल मैदानापेक्षा अधिक मोठे आहेत.

या संदर्भात स्ट्रेटोलाँचचे सीइओ जीन फ्लॉइड माहिती देताना म्हणाले, या विमानाचे हे पहिलेच उड्डाण फारच शानदार होते. यामुळे आम्हाला ग्राउंड लाँच सिस्टीममध्ये आणखी एक लवचिक पर्याय प्रदान करता आला आहे. या यशाबद्दल आम्हाला फ्लाईट क्रू, तसेच मोझावे एअर अँड स्पेस पोर्टचे सहकारी यांचा अभिमान वाटतो. विमानाचे पंख आणि लांबी यांनी विश्वरेकॉर्ड केले आहे. हे विमान प्रामुख्याने अंतराळात रॉकेट नेणे, सोडणे साठी तयार केले गेले आहे. प्रत्यक्षात ते रॉकेट उपग्रहाना त्याच्या अंतराळ कक्षेत पोहोचविण्यास मदत करेल. सध्या टेक ऑफ रॉकेटच्या मदतीने उपग्रह अंतराळ कक्षेत नेले जातात त्यापेक्षा हा पर्याय अधिक चांगला आहे.

हे विमान स्केल्ड कंपोझीटस नावाच्या अभियांत्रिकी कंपनीने बनविले असून अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने त्याचे स्वागत केले आहे.

Leave a Comment