या ठिकाणी लोक रस्त्यांवर नाहीतर पाण्यावर चालतात


या शहराबद्दल जगातील काही व्यक्तींना कदाचित माहित असेल. या शहराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असे आहे की येथील लोक रस्त्यांऐवजी पाण्यावर चालतात. असे म्हणतात की हे शहर १८ व्या शतकात जमिनीत गाडलेल्या अवस्थेत सापडले होते.

याबाबत मिललेल्या माहितीनुसार, ‘व्हेनिस ऑफ द नेदरलँड्स’ नावाचे आणखी एक शहर या धर्तीवर उपस्थित असून या शहराला ‘गिएथूर्न’ असे म्हणतात. केवळ २६०० ऐवढी या शहराची लोकसंख्या आहे.

या शहरात रस्त्यांपेक्षा अधिक कालव्याचा वापर केला जातो. येथील लोकांना कुठेही जायचे असल्यास ते येथील कालव्यांचाच वापर करतात. येथील पोस्टमन बोटच्या माध्यमातून पत्रांचे वाटप करतो. खरं तर, या शहराच्या कालव्यांची रचना अजब असून लोक या कालव्याचा वापर आपल्या शेतात जाण्यासाठी देखील करतात.

या शहरात १७६ लाकडी पूल असून जे शहराला सुंदर बनवतात. आता या सुंदर ठिकाणास भेट देण्यासाठी येथे दरवर्षी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. कार आणि बाइकपासून दूर असे हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे, या शहरात वाहने नेण्यासाठी पर्यटकांना सूचना देण्यात आली आहे.

येथे भेट देणारे पर्यटक सुंदर नौकांसह संपूर्ण शहराभोवती फिरतात. असे म्हटले जाते की येथे हिवाळीच्या दिवसात विशेषतः आइस स्केटिंगसाठी येथे लोक येतात. थंडीत देखील या शहराला भेट देण्यासाठी पर्यटक येथे येतात. येथे येणा-या पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता, येथे अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बांधण्यात आले आहेत.

असे म्हटले जाते की १८व्या शतकात या शहराचा शोध लावण्यात आला आहे. जेव्हा लोक येथे आले, तेव्हा त्यांनी पाहिले की चिखलाची घाण सर्वत्र पसरली होती. या जमिनीची उपयुक्तता समजून लोकांनी येथे खोदणे सुरू केले. अनेक वर्षे, जेव्हा उत्खनन कार्य चालू राहिले तेव्हा कालवे तयार करण्यात आले. त्यानंतर या विचित्र शहराचा चेहरा जगासमोर आला.

Leave a Comment