फूटबॉल खेळताय ? मग हे वाचा

foot

फूटबॉल खेळाडू डोक्याने फूटबॉल मारताना आपण अनेकदा पाहतो. मात्र यामुळे मेंदूला इजा होऊ शकते आणि खेळाडूची विचारशक्ती नष्ट होऊ शकते असे युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास मधील संशोधकांना आढळले आहे.

फूटबॉल खेळणे हा फिटनेस राखण्याचा एक चांगला मार्ग आहे. मात्र हा बॉल जेव्हा हेड केला जातो म्हणजे डोक्याने मारला जातो तेव्हा तो खेळाडूंना इजा पोहोचवू शकतो असे संशोधक अॅन सेराना यांना आढळले आहे. फूटबॉल न खेळणार्यांइच्या तुलनेत खेळणार्यां ची विचारशक्ती कमी असल्याचे त्यांना निरीक्षणातून आढळले आहे. त्यांच्या मते जेव्हा एकदे टार्गेट ठेवून त्या दिशेनेच पॉईंट केला जातो तेव्हा त्याचा परिणाम मेंदूच्या बाकी विचार करण्याच्या क्षमतेवर होतेा. टार्गेट कडे जाणे ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. मात्र फूटबॉलसारख्या खेळात चेंडू डोक्याने मारणे अशावेळी धोकादायक ठरू शकते.

अमेरिकन फूटबॉल प्लेअर्सची यासंबंधाने अनेक वर्षे निरीक्षणे केली गेली असता अनेकांच्या मेंदूला कांही ना कांही इजा झाल्याचे दिसून आल्याचेही अॅन यांचे म्हणणे आहे. ५० फूटबॉल खेळाडूंचा या संदंर्भात अभ्यास केला गेला तेव्हा त्यांतील अनेकांना मेमरी लॉस झाल्याचे, डिप्रेशन आल्याचे किवा डिमेन्शिया झाल्याचे आढळले. विशेष म्हणजे त्यात प्रसिद्ध फूटबॉलपटू कुली गिलख्रिस्ट, जॉन मॅकी यांचाही समावेश असल्याचे अॅना यांनी सागितले.

Leave a Comment