ही काही लहान मुलांच्या गोष्टीतली हकीकत नाही. बालवाङमयात असे बोलणारे प्राणी, झाडे, पक्षी असतात हे खरे असले तरी दक्षिण कोरियातील प्राणीसंग्रहालयातील कोशिक हत्तीही हुबेहुब माणसाच्या आवाजात कांही शब्द बोलतो. फक्त ते कळण्यासाठी आपल्याला कोरियन भाषा येणे गरजेच आहे.
माणसाच्या आवाजात बोलणारा हत्ती
बावीस वर्षांचा हा हत्ती सोंड तोंडात ठेवून हुबेहुब माणसाच्या आवाजात बोलतो. प्राणीसंग्रहालयात तो आला तेव्हा म्हणजे ऑगस्ट २००४ मध्ये तो १४ वर्षांचा होता. अँजेला स्टोजर या हत्तीशी संवाद साधण्यात तज्ञ असलेल्या संशोधकाने या हत्तीचे बोलणे प्रत्यक्ष ऐकले तेव्हा त्याचीही खात्री पटली. सुरवातीला पाच शब्द तो बोलत असे मात्र आता त्यातही पुष्कळ प्रगती कौशिक हत्तीने केली आहे.
हा हत्ती आशियाई असून त्याची त्याच्या प्रशिक्षकाबरोबर चांगलीच जवळीक आहे. अॅनाँग अंजा, अनिया, न्यूओ, चोक असे शब्द तो सुरवातील शिकला. त्याचा अर्थ आहे हॅलो, सीट डाऊन. नो, लाय डाऊन, गुड.
स्थानिक कोरियन माणसांना या हत्तीचे हे रेकॉर्डिंग ऐकविले गेले तेव्हा हा हत्तीचा आवाज आहे यावर त्यांचा विश्वास बसला नाहीच पण हत्ती नककी कोणते शब्द उच्चारतोय हेही त्यांना व्यवस्थित कळले. हा हत्ती लहान असताना एकाकी ठेवला गेला होता त्यामुळे प्रशिक्षक येताच त्याला जणू दोस्तच मिळाल्याची भावना झाली आणि त्यातून तो त्याच्यासारखेच शब्द हुबेहुब उच्चारू लागला असे सांगितले जात आहे.