शाओमीचे सीईओ दान करणार बोनसमध्ये मिळालेले 6631 कोटींचे शेअर

Xiaomi
बीजिंग – 96.1 कोटी डॉलरच्या (6,631 कोटी रूपये ) व्हॅल्यूचे 63.66 कोटी शेअर जगातील टॉपच्या स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक असलेल्या शाओमीचे फाउंडर आणि सीईओ ले जुन यांना बोनसमध्ये मिळाले आहेत. जुन यांनी कंपनीमध्ये दिलेल्या योगदानमुळे हे बोनस त्यांना दिले आहे. हे सर्व शेअर जुन दान करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती कंपनीने रेग्युलेटरी फाइलिंगमध्ये दिली. हे दान कंपनीकडून कोणाला दिले जाणार आहे, याचा खुलासा करण्यात आलेला नाही.

मागील वर्षी स्मार्टफोनच्या विक्रीत चीनमध्ये घट झाल्यामुळे शाओमीच्या शेअरची किंमत कमी झाली होती. सॅमसंग, अॅपल, हुवावे, ओप्पो आणि व्हीवो या स्मार्टफोनसोबत शाओमीला स्पर्धा करावी लागत आहे. स्मार्टफोन मार्केटमध्ये 10 वर्षांपासून असलेल्या शाओमी कंपनीचे शेअर्स मागील वर्षी जुलै महिन्यात हॉन्गकॉन्गच्या शेअर बाजारामध्ये लिस्ट झाले होते.

शाओमीचे शेअर कोसळुन सुध्दा जुन यांचे सध्याचे नेटवर्थ 11 अब्ज डॉलर आहे. ब्लुमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार त्यांचा जगातील 500 अब्जाधीशांच्या यादीत 126 वा क्रमांक आहे. रिसर्च फर्म आयडीसीनुसार शाओमी 2018 मध्ये जगातील चौथी मोठी स्मार्टफोन कंपनी म्हणून नावारूपाला आली होती. मागील वर्षी कंपनीची हँडसेट डिलीव्हरी ग्रोथ 32.2 टक्के होती.

Leave a Comment