ऑस्ट्रेलियातील 26 वर्षीय अब्जाधीश मॅथ्यू लेपर याने सोशल मीडियावर त्याला पीए हवा असल्याची जाहिरात दिली आहे आणि त्याने त्याच्या पीएला 52 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजे 25 लाख रुपये दर माह पगार देण्याचे म्हटले आहे.
चार कंपन्यांचा मॅथ्यू मालक असून आठवड्याची त्याची कमाई 59 लाख रुपये आहे. सोशल मीडियावर पीएसाठी जाहिरात देताना मॅथ्यूने म्हटले आहे कि ‘The Coolest Job in The World.’ या पीएचा पगार 25 लाख रुपये. त्याबरोबर राहणे, जेवण, प्रवास याचा सर्व खर्चही मॅथ्यू करणार आहे. त्याचबरोबर त्याच्या पीएला आरोग्य विमाही मिळणार. नोकरीसाठी येणाऱ्या व्यक्तीची क्षमता आणि अनुभव बघितला जाईल.
40 हजाराहून जास्त अर्ज या पदासाठी आले आहेत. त्यात 75 टक्के महिला आहेत. ब्रिटन, इटली, दक्षिण अमेरिका आणि आशियाच्या स्त्रिया आहेत. 23 ते 37 वयोगटातील अर्ज करणाऱ्या महिला आहेत. तुम्हाला मॅथ्यूसोबत काम करण्यासाठी कम्प्युटर यायला हवा. तुम्ही सोशल मीडिया एक्सपर्ट हवे. मॅथ्यूबद्दल माहिती तुमच्याकडे असायला हवी. त्यासाठी तुम्हाला त्याचे युट्युबवरील व्हिडिओज पाहायला लागणार आहे.