आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा शिखर धवन एकमेव फलंदाज

shikhar-dhawan
दिल्लीच्या संघाने काल कोलकाता नाइट रायडर्सला सलामीवीर शिखर धवन आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या खेळीच्या जोरावर 7 विकेटने पराभूत केले. दिल्लीने इडन गार्डनवर पहिल्यांदा कोलकात्याला हरवले आहे. शिखर धवनने दिल्लीला 7 विकेटने विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 63 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह त्याने नाबाद 97 धावांची खेळी केली. आयपीएलमधील ही धवनची सर्वोच्च धावसंख्या आहे.

आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा शिखर धवनने 90 पेक्षा जास्त धावा केल्या असून तो एक विक्रम आहे. 2011 मध्ये त्याने पंजाबविरुद्ध नाबाद 95 आणि 2018 मध्ये नाबाद 92 धावांची खेळी केली होती. त्याच्यानंतर विरेंद्र सेहवाग, विराट कोहली, शेन वॉटसन आणि डेव्हिड वॉर्नर यांचा नंबर लागतो. त्यांनी प्रत्येकी दोन वेळा अशी कामगिरी केली आहे.

अजूनही टी20 मध्ये दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनने शतक केलेले नाही. आयपीएलमध्ये तीन वेळा तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन वेळा 90 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये शिखर धवनने 150 सामने खेळले आहेत. त्याच्या आधी 11 खेळाडूंनी 150 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत.

Leave a Comment