पवारांनी उदयनराजेंना उमेदवारी त्यांच्या दहशतीला घाबरुन दिली

chandrakant-patil
सातारा – उदयनराजे भोसले यांच्या दहशतीला घाबरुन त्यांना शरद पवार यांनी उमेदवारी दिल्याचे वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. उदयनराजे यांना पवारांनी मनापासून लोकसभेची उमेदवारी दिली नसल्याचे सांगत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व त्यांचे उमेदवार उदयनराजे या दोघांवरही चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला. चंद्रकांत पाटील शिवसेना-भाजपच्या महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

गुप्त सर्वे सातारा लोकसभेच्या मतदारसंघात करण्यात आला असून त्यामध्ये उदयनराजे तुम्हाला आवडतात का ? असे विचारले तर नाही म्हणून उत्तर आले. पण खुला सर्वे केला असता त्यांच्या दहशतीमुळे नागरिक हात वर करतात. उदयनराजेंची एवढी दहशत आहे की, कोणीही हात वर करणार नाही. त्यांना शरद पवारही घाबरले आहेत. गुप्त मतदानाची जागृती अशा माणसाला हरवायचे असेल तर करायला हवी. दोन ते तीन लाख लोकांपर्यंत ही जागृती पोहोचली पाहिजे, असा त्यांनी राजकीय फॉर्म्युला सांगितला. यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील उपस्थित होते.

Leave a Comment