सुलतानपूर: मुस्लिम मतदारांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री मनेका गांधी वादात अडकल्या आहेत. निवडणूक आयोगाने या प्रकरणी नोटीस बजावल्यानंतर स्वत:च्याच आयटी सेलवर त्या भडकल्या. आमच्या आयटी सेलला काळजी घेण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. आयटी सेलची गरज आहे का, असा सवालदेखील संतापलेल्या मनेका यांनी उपस्थित केला.
मुस्लिमांबद्दलच्या वक्तव्यानंतर स्वतःच्याच आयटी सेलवर भडकल्या मनेका गांधी
लिहिलेले वाचून मी दाखवत नाही. जे काही मी बोलले, ते मनापासून बोलले, असे मेनका गांधींनी म्हटले. भाषणे मी पाठ करून येत नाही. प्रचारसभेत मी मुस्मिम मतदारांबद्दल जे बोलले आणि वृत्तवाहिन्यांवर जे दाखवण्यात आले, ते पूर्णपणे वेगळे होते. मी अशी नाही. आमच्यासोबत मुस्लिम बांधव यावेत, मी यासाठी पहिल्यापासून प्रयत्न करत असल्याचे मनेका म्हणाल्या. आमच्या आयटी सेलने या प्रकरणात काहीच केले नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केली.
ना माझे भाषण घेतले ना काही आयटी सेलने केल्यामुळे अशा आयटी सेलची खरच गरज आहे का असा प्रश्न मला पाडतो, असा संताप मनेका गांधीनी व्यक्त केला. दिवसभर फोटो आयटी सेलवाले क्लिक करतात. फोटो ते अपलोड करतात. अशा पद्धतीने निवडणूक होऊ शकत नसल्याचे मेनका गांधी म्हणाल्या. मुस्लिमांना प्रचारादरम्यान मनेका गांधी उघडउघड धमकी देत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्या वादात सापडल्या आहेत.