जिओने आणले 100 रुपयांहून कमी किंमतीचे प्लान

jio
मुंबई : सध्या टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी नवीन प्लान बाजारात आणत आहेत. ग्राहकांसाठी रिलायन्स जिओने एका नवीन प्लान आणला आहे. तुम्ही जर रिलायन्स जिओचे ग्राहक आहात आणि तुम्ही जर छोट्या रिचार्जवाला प्लान घेऊ इच्छिता तर अशा ग्राहकांसाठी जिओने 100 रुपयांहून कमी किंमतीचे प्लान आणले आहे. या 100 रुपयांहून कमी किंमतीच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, इंटरनेट आणि मेसेजची सुविधा देण्यात आली आहे.

19 रुपयांपासून प्लान जिओ कंपनीकडून ग्राहकांसाठी देण्यात आला आहे. 19 रुपयांमध्ये एका दिवसांसाठी इंटरनेट, मेसेज आणि अनलिमिटेड प्लान देण्यात आला आहे. 150 एमबी डेटा, कोणत्याही क्रमांकावर अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला 20 मेसेज देण्यात आले आहेत. या प्लानची वॅलिडिटी 1 दिवस आहे.

जिओने एका आठवड्यासाठी कमी किंमतीचा प्लान हवा असल्यास 7 दिवसांसाठी 52 रुपयांच्या प्लानची सुविधा देण्यात आली आहे. या प्लानमध्ये 7 दिवसांसाठी 1.05 जीबी इंटरनेट डेटा आणि कोणत्याही नंबरसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. त्याशिवाय 70 मेसेज देण्यात आले आहेत. 7 दिवस एवढी या प्लानची वैधता आहे. जिओकडून 28 दिवसांसाठी 98 रुपयांचा प्लान देण्यात आला आहे. या प्लानमध्ये ग्राहक 300 मेसेज, अनलिमिटेड कॉलिंग आणि 2 जीबी इंटरनेट सुविधेचा फायदा घेऊ शकतात.

Leave a Comment