मराठीसह १० भाषेत रिलीज होणार होणार ‘फास्ट अँड फ्युरिअस’चा ट्रेलर

fast
प्रेक्षकांना ‘फास्ट अॅण्ड फ्युरिअस’ या सीरिजमधील प्रत्येक भाग खिळवून ठेवतो. या चित्रपटाचे आतापर्यंत आलेले सर्व भाग सुपरहिट ठरले होते.


आता या चित्रपटाचा नवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या भागाचे दिग्दर्शन एफ. गॅरी यांनी केले असून यात माइकल रोड्रिज, टेरेसा गिब्सन, लुडाक्रिस, लुकास ब्लॅक, स्कॉट इस्टवुड, कर्ट रसेल आणि चार्लीज थेरोन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाच्या पुढच्या भागाचा ट्रेलर तब्बल १० भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा ट्रेलर हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, गुजराती, भोजपूरी, पंजाबी आणि बंगाली या भाषांमध्ये पाहता येणार आहे. या चित्रपटाच्या कलाकारांचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहेत. हा चित्रपट २ ऑगस्ट २०१९ रोजी रिलीज होणार आहे.

Leave a Comment