मोदींच्या विरोधात निवडणूक लढवणार डुप्लिकेट मोदी

abhinandan-pathak
लखनौ – अभिनंदन पाठक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे दिसतात. त्यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा प्रचार केला होता. आता तेच पाठक चक्क मोदींच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी लखनौ लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूकीत जिंकल्यानंतर आपण पंतप्रधान होण्यासाठी राहुल गांधी यांना पाठिंबा जाहिर करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

२०१४च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांची पुर्ती न केल्यामुळे आपण त्यांच्यावर नाराज असल्याचे अभिनंदन यांनी म्हटले आहे. या निवडणुकांमध्ये आपण कोणाच्याही विरोधात उभे नसून सरळ ‘जुमला’ सरकारच्या विरोधात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २६ एप्रिलला वाराणसी या मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघातून अभिनंदन पाठक उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अलिकडेच पाठक यांनी राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेसचा प्रचार केला होता. काँग्रेसची उमेदवारी मिळण्यासाठी पाठक यांनी खुप धडपड केली होती. पण, त्यांना काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष लढण्याचा निश्चय केला.

Leave a Comment