गरोदरपणाच्या अफवेवर दीपिकाचा खुलासा

deepika-padukone
गेल्या वर्षी अभिनेत्री दीपिका पादुकोण व अभिनेता रणवीर सिंह लग्नबेडीत अडकले. त्यांच्या लग्नानंतर सगळीकडे दीपिका गरोदर असल्याची चर्चा होऊ लागली. पण दीपिकाने नुकत्याच एका मुलाखतीत गरोदरपणाबाबत खुलासा केला आहे. गरोदर असल्याचे वृत्त खोटे असल्याचे तिने सांगितले.

दीपिका म्हणाली की, कधीना कधी तरी मी आई होणारच आहे. पण महिला किंवा जोडप्यांवर पालक बनण्यासाठी दबाव टाकला पाहिजे नाही. महिलांवर आई बनण्याबाबत ज्या दिवशी विचारण्याचे बंद होईल, त्यावेळीच वास्तविकमध्ये समाजात बदल होऊ शकेल. दीपिका व रणवीर यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि ते तेवढेच एकमेकांचा आदर करतात. त्याचबरोबर सोशल मीडियावर त्यांचे प्रेम चाहत्यांना पाहायला मिळते.

दीपिका सध्या ‘छपाक’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती अॅसिड अटॅक सर्व्हायव्हर लक्ष्मी अग्रवालच्या भूमिकेत दिसणार आहे. एक वर्षांपूर्वी दिल्लीत एका कार्यक्रमाच्या दरम्यान लक्ष्मी आणि दीपिकाची पहिली भेट झाली होती असे दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले होते. दीपिका आणि लक्ष्मी या दोघांनाही दिल्लीतील पुरस्कार सोहळ्यात आपल्या कार्यासाठी गौरवण्यात आले होते. दीपिका त्यावेळी पहिल्यांदा लक्ष्मीला भेटली होती.

दीपिका पादुकोण ‘छपाक’ मधून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. यात विक्रांत मेस्सी दीपिकाच्या पतीची आलोक दीक्षितची भूमिका साकारत आहे. मेघना गुलजार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका आणि मेघना गुलजार पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. छपाक चित्रपट १० जानेवारी, २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment