सिडनी – बलात्कार प्रकरणात इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये वोरसेस्टरशायरकडून खेळणाऱा ऑस्ट्रेलियन खेळाडू दोषी आढळला आहे. झोपलेल्या महिलेवर बलात्कार केल्याचा अॅलेक्स हेपबर्नवर आरोप होता. ही घटना 1 एप्रिल 2017 मध्ये घडली होती. वेरसेस्टर क्राउन कोर्टाने या प्रकरणी त्याला दोषी ठरवले आहे.
बलात्कार प्रकरणात दोषी आढळला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
सुरुवातीला अॅलेक्सने महिलेचा बलात्काराचा आरोप फेटाळून लावला होता. तसेच, आपली बाजू मांडताना त्याने म्हटले होते की, तिच्यासोबत काय होत आहे याची त्या महिलेला कल्पना होती. कोर्टात याप्रकरणी 10 तास 53 मिनिटे युक्तिवाद झाला. न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू मांडल्यानंतर अॅलेक्सला बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवले.
न्यायालयात पीडित महिलेने म्हटले की, तिच्यासोबत अॅलेक्स आहे हे तिला माहिती नव्हते. त्याने जेव्हा मला स्पर्श केला तेव्हा समजले की तो क्लार्क नसून अॅलेक्स आहे. क्लार्क त्यावेळी कुठे आहे असेही अॅलेक्सला विचारले. पण, अॅलेक्सने तिच्या सौंदर्याचे कौतुक करत शारीरिक संबंधासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा त्याला नकार दिल्यानंतरही जबरदस्तीने संबंध ठेवले. वेस्टर्न ऑस्ट्रेलियात जन्मलेला अॅलेक्स हेपबर्न क्रिकेटच्या करिअरसाठी 2013 मध्ये इंग्लंडला आला होता. मात्र, या प्रकरणानंतर त्याचे क्रिकेटमध्ये करिअर करण्याचे स्वप्न होते.