मर्सिडीज स्पोर्ट्स कार निर्मितीची सव्वाशे वर्षे पूर्ण

merse
जगातील सर्वात जुनी कार उत्पादक जर्मन कंपनी मर्सिडीजने मोटार स्पोर्ट्स सेग्मेंट मध्ये १२५ वर्षे पूर्ण केली असून त्याचा वर्धापन दिन अनोख्या पद्धतीने ब्रिटन मध्ये शनिवारी साजरा केला जात आहे. या निमित्ताने ब्रिटनच्या सिल्व्हरस्टोन सर्किटवर आजपर्यंत मोटर रेसिंग मध्ये सहभागी झालेल्या मर्सिडीजच्या बहुतेक सर्व कार पुन्हा धावणार आहेत. याच सर्किटवर जगातील पहिली फॉर्म्युला वन रेस १९५० साली झाली होती.

या निमित्ताने या सर्किटवर धावणाऱ्या मर्सिडीज रेसिंग कार मध्ये सर्वात जुनी आणि लेटेस्ट अश्या सर्व प्रकारच्या कार्स पुन्हा एकदा प्रेक्षकांना दर्शन देणार आहेत. या सर्व कार्सनी कधी ना कधी रेसिंग मध्ये हिस्सा घेतलेला आहे. या कार्स सर्किटवर येताना तीन सेग्मेंट मध्ये येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यात पहिल्या टप्प्यात दुसऱ्या महायुद्धापूर्वी उत्पादन झालेल्या कार्स असतील, दुसऱ्या टप्प्यात ६० च्या दशकानंतर उत्पादित झालेल्या कार्स असतील तर तिसऱ्या टप्प्यात आधुनिक कार्स असतील.

racing
फॉर्म्युला वनच्या आत्तापर्यंत ९९९ रेस झाल्या असून १ हजारावी ऐतिहासिक रेस चीनच्या शांघाई सर्किटवर रविवारी होत आहे. यात सर्वाधिक एफवन जिंकणाऱ्यात मर्सिडीज ८९ रेसेस जिंकून चार नंबरवर आहे. पहिल्या स्थानावर फेरार्री असून त्यांनी २३५ विजय मिळविले आहेत तर त्यापाठोपाठ मॅक्लरेन १८२, विलियम्स ११४ यांचा नंबर आहे.

१८९४ पूर्वी घोडागाडीच्या रेस लावल्या जात असत. १८९४ साली प्रथम विना घोडा म्हणजे कार रेस सुरु झाल्या. या रेसमध्ये मर्सिडीजचा सहभाग होता आणि रविवारी चायनीज ग्रांप्री, शान्घाय सर्किटवर होत असलेल्या रेस मध्येही मर्सिडीज आहे.

Leave a Comment