जेट हिस्सेदारी साठी पुन्हा नरेंद्र गोयल यांची बोली

nareshgo
जेट एअरवेज कर्जबाजारी झाल्यावर जेटचे मुख्य गुंतवणूकदार आणि संस्थापक नरेंद्र गोयल आणि त्यांच्या पत्नी यांना बोर्डातून राजीनामा देऊन बाहेर पडावे लागल्याच्या पार्श्वभूमीवर गोयल यांनी जेट साठी पुन्हा बोली लावली आहे. जेट एअरवेज मधील हिस्श्यासाठी शुक्रवारी सायंकाळी संपलेल्या मुदतीत सात कंपन्या आणि लोकांनी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट सबमिट केली असून तत्यात एतिहाद तसेच जेटचे संस्थापक गोयल यांचा समावेश आहे.

अन्य पाच कंपन्यात कॅलिफोर्नियाची इन्व्हेस्टमेंट फर्म टीडीपी, फिनिक्स मधील प्राथमिक इन्व्हेस्टमेंट फर्म इंडिगो पार्टनर्स, रेड क्लिफ, व थिंक इक्विटी यांचा समावेश आहे. जेटच्या एक्झिक्युटिव्ह उपाध्यक्षांनी गोयल यांनी हिस्सेदारीसाठी बोली लावल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सध्या जेटची फक्त ६ – ७ विमाने कार्यरत आहेत. एसबीआय एओआयने या संदर्भात काही माहिती देण्यास नकार दिला आहे.

एतीहादने त्यांच्या सध्याच्या २४ टक्क्यावरून जेट मधील भागीदारी ४९ टक्क्यावर नेण्याच्या प्रयत्न असल्याचे संकेत दिले आहेत. ज्या कंपनी इओआय साठी योग्य तसेच पीएसयु, सरकार समर्थन असलेले फंड व अर्धी मालकी असलेल्या कंपन्या ३० एप्रिलपर्यंत बोली लावू शकणार आहेत.

दरम्यान जेटने सोमवारपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित केली असून नियमानुसार १ वर्षापेक्षा अधिक सेवा देणाऱ्या विमान कंपनीच्या ताफ्यात किमान ५ विमाने हवीत असे बंधन आहे. २६ वर्षे सेवा देत असलेल्या जेटला सोमवार पर्यंत त्यांचा उड्डाण परवाना कायम राखण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असून त्यांना फंड मिळाले तर त्यांची विमाने उडू शकणार आहेत.

Leave a Comment