स्मार्टफोन खरेदीवेळी काय पाहाल?

smat
स्मार्टफोन ही आज लोकांसाठी चैन नाही तर अत्यावश्यक गरज बनली आहे. त्यामुळे प्रत्येकजण आज ना उद्या स्मार्टफोन खरेदीचा विचार करणार यात शंका नाही. अर्थात दररोज स्मार्टफोन कंपन्या नवनवीन फिचर असलेले स्मार्टफोन बाजारात आणत आहेत आणि जाहिरातीचा भडीमार इतका प्रचंड आहे की आपण नक्की काय निवडावे याचा संभ्रम ग्राहकांना होतो. अश्यावेळी काही गोष्टी पडताळून घेतल्या तर स्मार्टफोन खरेदी नक्कीच काहीशी सोपी आणि योग्य होऊ शकेल. खरेदी करताना लक्षात ठेवायच्या काही महत्वाच्या बाबी अश्या,

screen
सर्वप्रथम आपले स्मार्टफोन खरेदीचे बजेट ठरविले पाहिजे. आपल्या गरजा, होणारा वापर ठरवून हे बजेट प्रथम निश्चित करावे आणि त्यानंतर त्या बजेटमध्ये कोणत्या कंपन्याचे कोणते फोन मिळतात याचा शोध घ्यावा आणि त्याची यादी तयार करावी. बजेट फोनमध्ये डिस्प्लेला अधिक महत्व दिले पाहिजे. स्मार्टफोन साठी अनेक प्रकारचे डिस्प्ले येतात, एचडी, एचडी प्लस, फुल एचडी, एलसीडी, एमोलेड यात कोणत्या फोनचा डिस्प्ले अधिक चांगला आहे ते तपासावे.

स्मार्टफोनचा मुख्य नायक आहे प्रोसेसर. त्यामुळे आपल्याला जो फोन घ्यायचा आहे त्यात लेटेस्ट व चांगला प्रोसेसर कोणता आहे हे पाहावे. स्मार्टफोनच्या डीटेल्स मध्ये प्रोसेसरचे व्हर्जन सहज कळते. त्यानंतर पाहावे ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे ओएस. ओएसवर स्मार्टफोनच्या स्पीडचा प्रभाव पडतो. प्रोसेसर, रॅम, ओएस कोणती त्यावर स्मार्टफोन कसे काम करेल ते ठरत असते. काहीवेळा सॉफटवेअर ऑप्टीमायसेशन स्मार्टफोनचा पर्फोर्मंस वाढवितो.

battery
फोनची बॅटरी क्षमता आवर्जून लक्षात घ्यायला हवी. कारण बॅटरी लवकर संपत असेल तर अनेक समस्या येतात. त्यामुळे फोनचा वापर अधिक होणार असेल तर बॅटरी दमदार हवी. आजकाल फास्टचार्जिंगचा जमाना आहे तेव्हा ती सुविधा असेल तर उत्तमच. शेवटी कॅमेरा हाही एक महत्वाचा भाग. आजकाल स्मार्टफोन केवळ बोलण्यासाठी वापरला जात नाही तर फोटो काढण्यासाठीही मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्यामुळे कॅमेरा फिचर पाहताना केवळ किती मेगापिक्सल हे पाहण्यापेक्षा त्यासोबत वाईड अँगल, एचडीआर आहे वा नाही हे पाहावे. शेवटी महत्वाचे तुम्ही जो फोन घेणार त्याचा नुसता ब्रांड पाहण्यापेक्षा त्यांची आफ्टर सेल सर्व्हिस कोण अधिक चांगली देतो याचा तपास करावा. कारण सॉफटवेअर सिक्युरिटी अपडेट वेळोवेळी मिळणे हे महत्वाचे असते अन्यथा फोन वारंवार हँग होऊ शकतो.

Leave a Comment