शामसरन नेगी, स्वतंत्र भारताचे पहिले ज्येष्ठ मतदार

negi
सध्या भारतात लोकसभेसाठी मतदान सुरु आहे. येत्या १९ मे रोजी मतदान होणाऱ्या भागात एका खास मतदार सहभागी होणार असून त्यांचे नाव आहे शामसरन नेगी आणि त्यांचे वय आहे १०२ वर्षे. स्वतंत्र भारताचे ते पहिले मतदार आहेत आणि आजपर्यंत त्यांनी पंचायत निवडणुकीपासून ते लोकसभेसाठी जेवढे वेळा मतदान झाले तेव्हा प्रत्येक वेळी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. नेगी यांना भारतीय लोकशाहीचे लिविंग लिजंट म्हणून ओळखले जाते आणि ते हिमाचल राज्याचे रहिवासी आहेत. ते हिमाचल मधील निसर्गसुंदर कालपा गावात त्यांचा मतदानाचा हक्क बजावतात. नेगी सांगतात यंदाही प्रकृती चांगली राहिली तर मतदान करणार आहे. कोण जाणे, कदाचित माझे हे शेवटचे मतदान असेल. मतदानाचे महत्व मी जाणतो आणि आवर्जून मतदान करतो.

kalpa
नेगी यांनी सर्वप्रथम ऑक्टोबर १९५१ मध्ये मतदान केले होते. ते सांगतात, तो माझ्या आयुष्यातील मोठा दिवस होता. वास्तविक स्वतंत्र भारताचे पहिले मतदान फेब्रुवारी मार्च १९५८ मध्ये झाले पण त्यावेळी आमच्या भागात बर्फवृष्टी आणि खूप थंडी असते त्यामुळे ते ५ महिने अगोदर घेतले गेले. नेगी त्यावेळी शेजारच्या गावात शाळेत शिक्षक होते. त्यांच्यावर पोलिंग बूथची जबादारी होती त्यामुळे स्वतःच्या गावी जाऊन मतदान कसे करायचे हा प्रश्न होता. पण तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना मतदान संपण्याअगोदर सुट्टी दिली आणि त्यांनी गावात जाणून मतदानाचा हक्क बजावला.

नेगी यांचा जन्म १ जुलै १९१७चा. आता ते थकले आहेत, डोळ्याला कमी दिसते, कमी ऐकू येते. नेगी हे भारतातील सर्वात वयोवृद्ध मतदार असल्याचे निवडणूक आयोगाने शोधून काढल्यावर २००७ साली त्यांना आयकॉन मतदार बनविले असून तीच त्यांची ओळख बनली आहे. निवडणूक आयोगाकडून नेगी मतदानाला आले कि प्रत्येकवेळी त्यांचे स्वागत केले जाते. २०१४ मध्ये गुगलने नेगी यांच्यावर प्लेज टू व्होट नावाची फिल्म बनविली होती आणि ती इंटरनेटवर व्हायरल झाली होती. नेगी यांच्या मते मतदानासाठी इव्हीएम मशीन सर्वात चांगली आहेत. त्यावर उमेदवाराचा फोटो असतो आणि मत टाकले कि मशीन मधून बीप येतो त्यामुळे आपले मत नोंदले गेले हे समजते.

नेगी यांना १५ हजार रुपये पेन्शन मिळते. ते निवृत्त झाले तेव्हा त्यांना ७०० रुपये पगार होता असेही ते हसत सांगतात.

Leave a Comment