काँग्रेसमध्येच राहणार वडील – सुजय विखे

combo
नगर – मुलाने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होत्या. पण आता या चर्चेला खुद्द सुजय विखे पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे. काँग्रेसमध्येच विखे-पाटील हे राहणार असल्याचे सुजय विखे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

मी वडील काँग्रेसमध्ये असताना भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ती माझी वैयक्तिक बाब आणि निवडणूक असल्यामुळे भाजपमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सुजय विखे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजपचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी अहमदनगरमध्ये सभा घेणार आहेत. याची जय्यत तयारीही करण्यात आली आहे. राधाकृष्ण विखे-पाटील याच सभेत भाजपत प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र, आता ही केवळ अफवाच ठरली आहे.

Leave a Comment