मध्यप्रदेशमधील भाजप समर्थकांचा पुणे पॅटर्न

modi
ग्वालियर – पुणेकर हे आपल्या वेगवेगळ्या पाट्यांमुळे राज्यात तसेच देशभरात प्रसिद्ध आहेत. त्यातच लोकसभा निवडणूक असल्यामुळे देशभरातील लोकांमध्ये तसेच राजकीय पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवार असो वा राजकीय नेते कोणतीची कमतरता बाळगत नाही. त्यातच कोणी जर एखाद भन्नाट पाटी किंवा पोस्टर्स लावले तर आपल्या डोळ्यासमोर पुणे पॅटर्न येतो. याच पार्श्वभूमिवर भाजपच्या समर्थकांनी मध्य प्रदेशातील ग्वालियर भागात पुणेरी पद्धतीने हटके प्रचार करण्यात येत आहे. मुरैना जिल्ह्यामधील गावांमध्ये लोकांच्या घराबाहेर लावलेले हे पोस्टर्स लोकांचे लक्ष नक्कीच वेधून घेत आहेत. भाजप समर्थकांनी हे पोस्टर्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी लोकांच्या घराबाहेर लावण्यात आले आहेत.

नरेंद्र मोदीच्या समर्थनार्थ हे पोस्टर्स रामनगर क्षेत्रातील भाजपच्या समर्थकांनी लावले आहेत. डोअर बेल खराब आहे, कृपया दरवाजा उघडण्यासाठी मोदी मोदी ओरडा या आशयाचा मजकूर या पोस्टरमध्ये लिहिण्यात आला आहे. रामनगरमधील एक डझनहून अधिक घरांच्या बाहेर अशा प्रकारचे पोस्टर चिकटवण्यात आले आहे. ज्या घरांच्या बाहेर असे पोस्टर लावण्यात आले आहेत त्यातील एका घराच्या मालकाने सांगितले की, आमच्या घराची डोअर बेल खराब झाली होती. त्यानंतर काहीतरी नवीन करण्याचा विचार माझ्या डोक्यात होता. सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने अशा प्रकारचा मजकूर लिहून हे पोस्टर मी घराबाहेर लावले. पण या पोस्टरचे लोण त्यानंतर हळूहळू संपूर्ण रामनगर परिसरात पसरत गेले. हे पोस्टर सोशल सध्या मिडीयात मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले आहे.

Leave a Comment