फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची बादशाहत

narendra-modi
नवी दिल्ली – सोशल मिडीयाचा 2014 च्या लोकसभा निवडणुकीत प्रभावी वापर करुन देशाती सत्ता नरेंद्र मोदी यांनी काबीज केली. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यात सोशल मिडीयाचे बहुमूल्य योगदान आहे. नरेंद्र मोदींवर अनेक वर्षानंतर विश्वास टाकत प्रचंड बहुमतांनी लोकांनी मोदी सरकार निवडून दिले. नरेंद्र मोदी यांना सोशल मिडीयावर फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहेच. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

फेसबुकवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्राझीलचे नवीन राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांना नरेंद्र मोदी यांनी मागे टाकत फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून ओळख निर्माण केली आहे. 2019 वर्ल्ड लीडर ऑन फेसबुक अहवालानुसार 4.35 कोटी लाईक्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक फेसबुक पेजला आहेत तर त्यांच्याशी जोडलेल्या इतर पेजला जवळपास 1.37 कोटी लाईक्स मिळाले आहेत.


वर्ल्ड लीडर ऑन फेसबुक अहवालानुसार नरेंद्र मोदी यांच्यानंतर दुसऱ्या नंबरवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा नंबर लागतो. 2.30 कोटी लाईक्स डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेसबुक पेजला आहेत. दरवर्षी हा अहवाल तयार केला जातो. तर या अहवालानुसार ब्राझीलचे नवीन राष्ट्रपती जायर बोल्सोनारो फेसबुकवर सर्वाधिक वेळ घालवत असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment