व्हॉट्सअॅप आता लँडलाईनवरही चालणार

whatsapp
नवी दिल्ली – तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेले व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचे अत्यंत सुलभ आणि प्रभावी माध्यम असून व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने युजर्सचे चॅटिंग आणखी मजेशीर व्हावे यासाठी नवनवीन फीचर आणत असते. पण आता लँडलाईनवरही व्हॉट्सअॅप चालणार आहे. आपल्या लँडलाईन नंबरसोबत आपल्याला हवे असल्यास व्हॉट्सअ‍ॅप युजर्स कनेक्ट करू शकतात. तुम्हाला यासाठी तुमचा मोबाईल नंबर कोणासोबत शेअर करण्याचीही गरज लागणार नाही व्हॉट्सअ‍ॅपच्या व्हॉट्सअॅप बिजनेस अॅप युजर्सना या फीचरचा फायदा अधिक होणार आहे. व्यावसायिक या फीचरच्या मदतीने आपल्या लँडलाईन नंबरवरून आरामात व्हॉट्सअ‍ॅप ऑपरेट करू शकतात. तसेच या फीचरचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला नको असलेल्या लोकांसोबत युजर्सचा पर्सनल मोबाईल नंबर शेअर करता येत नाही.

व्हॉट्सअॅप लँडलाईनसोबत कनेक्ट करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनमध्ये नॉर्मल व्हॉट्सअॅप किंवा व्हॉट्सअॅप बिजनेस अॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर व्हॉट्सअॅप स्मार्टफोन, टॅबलेट आणि लॅपटॉपवर ओपन करा. व्हॉट्सअॅप ओपन केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप युजर्सकडे कंट्री कोड आणि मोबाईल नंबर मागते. त्यावेळी लँडलाईन नंबर एंटर करा. नंबर एंटर केल्यानंतर युजर्सचा नंबर व्हेरिफाय केला जाईल. त्यासाठी कॉल अथवा मेसेज पाठवला जाईल. त्यासोबतच त्यानंतर कॉल मीचा पर्याय देखील मिळेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरू होईल. कॉल ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या लँडलाईन नंबरवर एक कॉल येईल. तो कॉल रिसीव्ह केल्यावर 6 डिजीटचा एक व्हेरिफीकेशन कोड सांगितला जाईल. त्यानंतर तो कोड टाकून पुढची प्रोसेस करा. तसेच प्रोफाईल फोटो, नाव आणि विचारण्यात आलेले इतर काही डिटेल्स देऊन सोप्या पद्धतीने व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करू शकता.

Leave a Comment