आता हेल्मेटमध्येही घ्या एसीचा गारवा

helmet
वाढत्या उन्हामुळे होणारी गरमी किती असाहय्य असते आपण सगळेच चागंले जाणतो. वाढत्या उन्हामुळे कित्येक बाईक चालवताना हेल्मट वापरण्याचे टाळतात. पण असे करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण बाजारपेठेत एक अनोखे डिव्हाईस आले आहे, ज्या लावल्यानंतर तुम्ही आवडीने हेल्मेट घालणार आहात. उन्हामुळे तुमच्या शरीरासोबत डोक्याची होणारी लाहीलाही या डिव्हाईसमुळे थंड राहणार आहे. फारच युनिक पद्धतीने हे डिव्हाईस काम करते. या डिव्हाईसमध्ये एक छोटासा एसी बसवला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

ब्ल्यूस्नॅप2 (BlueSnap2) असे या प्रॉडक्टचे नाव आहे, बंगळुरुच्या एका कंपनीने हे प्रॉडक्ट तयार केले आहे. हेल्मेटला हे डिव्हाइस अटॅच केल्यानंतर डोके तर थंड राहिलच सोबतच तुमचा प्रदूषणापासूनही बचाव होईल. कारण यात एक एअर फिल्टर लावण्यात आला आहे. कंपनीने याआधी एक ब्ल्यूस्नॅप प्रॉडक्ट लॉन्च केले होते. त्यात काही बदल करुन त्यांनी ब्ल्यूस्नॅप2 हे प्रॉडक्ट आणले आहे.

एक छोटा पंखा या डिव्हाइसमध्ये लावण्यात आला आहे. ताजी हवा शोषूण हा पंखा स्वच्छ आणि थंड करतो. त्यानंतर तो हवा हेल्मेटमध्ये दाखल होऊ देतो. म्हणजे कितीही तापमान वाढले तरी तुम्हाला थंड वाटणार. फोम आधारित फिल्टर या कूलरमध्ये लावण्यात आल्यामुळे ज्यामुळे कूलरचे पाणी जास्त वेळ चालते. २, २९९ रुपये एवढी या कूलरची किंमत आहे.

केवळ १० सेकंदात गरम वातावरणात हा कूलर हेल्मेटला थंड करतो. त्याचबरोबर बॅटरीवर चालणारा हा कूलर तुम्हाला कारचे फिलिंग देईल. म्हणजे धूळ-माती आत पोहोचणार नाही. तुम्ही यातील बॅटरी यूएसबी केबलच्या मदतीने चार्ज करु शकता. एकदा चार्ज केल्यावर बॅटरी १० तास चालते.

Leave a Comment