निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदाना दरम्यान जप्त केले 2 हजार 626 कोटी रुपये

election1
नवी दिल्ली – काल 17 व्या लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. त्याच दरम्यान संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 2 हजार 626 कोटी रुपये जप्त करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत दिली आहे.

आयोगाने जप्त केलेल्या 2 हजार 626 कोटी रुपयांमध्ये 607 कोटी नगदी स्वरुपात असून 198 कोटी रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर 1 हजार 91 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तसेच 486 कोटी रुपयांचे धातू आणि इतर 48 कोटी रुपयांचे साहित्यही जप्त करण्यात आले असल्याचेही निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, ईव्हीएम बिघाडाच्या घटना काही ठिकाणी घडल्या असल्याचेही आयोगाने सांगितले. आंध्र प्रदेशात 6, अरुणाचलमध्ये 5, बिहारमध्ये 1, मणिपूरमध्ये 2 आणि पश्चिम बंगालमध्ये 1 याप्रमाणे ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी आल्या आहेत, असेही आयोगाने स्पष्ट केले. दंतेवाडा जिल्ह्यातील बस्तर येथेही निवडणूक शांततेत पार पडली. येथे न घाबरता लोकांनी मोठ्या संख्येने मतदान केले. याठिकाणी 77 टक्के मतदान झाले, अशी माहितीही आयोगाने दिली.

Leave a Comment