एका ब्रिटीश महिलेला २ वर्षांची शिक्षा दुबईमध्ये आपल्या घटस्फोटीत पतीच्या दुसऱ्या पत्नीसाठी फेसबुकवर वादग्रस्त शब्द वापरल्याप्रकरणी मिळाली आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावरच तिने घटस्फोटीत पतीला ‘इडियट’ असे देखील म्हटले होते. लालेह शाहर्वेश(५५) हिला याच घटस्फोटीत पतीच्या अंत्यसंस्काराहून परत येत असताना दुबई एअरपोर्टवर अटक करण्यात आली होती. महिलेला अटक करण्यात आल्यावर साधारण एका महिन्याने जामीन देण्यात आला आहे.
फेसबुकवर दुसऱ्या पत्नीसोबतचा फोटो २०१६ मध्ये घटस्फोटीत पतीने शेअर केला होता. या महिलेने त्यावर कमेंट केली होती. तीन वर्षांनी आता याप्रकरणी निर्णय आला असून दोन वर्षांची शिक्षा न्यायालयाकडून महिलेला सुनावण्यात आली होती. जवळपास ८२० डॉलरचा दंडही ठोठावण्यात आल्याचे बोलले जात आहे. दुबईमध्ये महिलेला तिच्या १४ वर्षांच्या मुलीसोबत अटक करण्यात आली होती. तीन वर्ष जुन्या फेसबुक पोस्टबाबत महिलेल्या घटस्फोटीत पतीच्या दुसऱ्या पत्नीने तक्रार केली होती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार १८ वर्षांपूर्वी ब्रिटनमध्ये राहणारी लालेह शरावेश(५५) आणि तिच्या घटस्फोटीत पतीचा विवाह झाला होता. संयुक्त अरब अमिरातीमध्ये लग्नानंतर ८ महिने ती थांबली होती. ब्रिटनला आपल्या मुलीसोबत महिला परत गेली होती. पण तिचा पती तिथेच थांबला होता. दोघांनी त्यानंतर घटस्फोट घेतला होता. घटस्फोटीत पतीच्या दुसऱ्या पत्नीला लालेहने ‘घोडी’ म्हटले होते. यासंदर्भात डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, लालेह घटस्फोटीत पतीच्या अंत्यसंस्कारासाठी यूएईला आली होती.
घटस्फोटीत पतीने दुसरे लग्न केल्याचे फेसबुकवर फोटो शेअर केलेल्या फोटोवरुन महिलेला कळाले होते. लालेह यांनी या फोटोवर फारसी भाषेत टिका केली होती. ज्यातील एक कमेंट मुर्ख ही होती. तर तू मला या घोडीसाठी सोडले. मला आशा आहे की, तू जमिनीत जाशील. लालेहला तेव्हाच कळाले की, तिच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. लालेहच्या मुलीला ब्रिटनला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण लालेह यांचा पासपोर्ट ताब्यात घेण्यात आला होता. पण आता जामीनानंतर तिला घरी जाण्याची परवानगी मिळाली आहे.
सवतीच्या फोटोवर केली वाईट कमेंट, २ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा!
इंग्लंडमध्ये राहूनच लालेहने फेसबुकवर पोस्ट केली होती. तिला त्यावेळी असे काही होईल याची कल्पनाही नव्हती. तिला याबाबतची बारीकशी कल्पना देखील नव्हती की, तिच्यावर सोशल मीडियातील पोस्टमुळे दुबईमध्ये केस होऊ शकते. संयुक्त अरब अमीरातीच्या सायबर कायद्यानुसार, जर कुणी सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीसाठी अपशब्द वापरले तर त्या व्यक्तीला तरुंगवासाची शिक्षा आणि दंड भरावा लागतो.